13 November, 2025

जिल्ह्यातील साखर कारखान्याचा ऊसतोडणी व वाहतूक खर्च दर निश्चित

• ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जवळच्या कारखान्याची निवड करावी हिंगोली (जिमाका), दि. 13 : सद्यस्थितीत कारखान्यामार्फत ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारणी करुन शेतकऱ्यांच्या वतीने ऊस तोडणी व वाहतूक केली जाते. यासाठी आलेला खर्च हा ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या ढोबळ रास्त व किफायतशीर दराच्या (एफआरपी) देय रकमेतून कपात करण्यात येतो. त्यानुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गाळप हंगाम 2024-2025 या वर्षाच्या ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची माहिती व्हावी, यासाठी कारखानानिहाय ऊसतोडणी व वाहतूक खर्चाबाबतची माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. डोंगरकडा ता. कळमनुरी युनिट-2 जि. हिंगोली या कारखान्याचा प्रती मेट्रिक टन सरासरी ऊस तोडणी व वाहतूक दर 866.69 रुपये आहे. पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमतनगर जि. हिंगोली या कारखान्याचा प्रती मेट्रिक टन सरासरी ऊस तोडणी व वाहतूक दर 885.88 रुपये आहे. कपीश्वर शुगर अँन्ड केमिकल लि., जवळाबाजार ता. औंढा नागनाथ या कारखान्याचा प्रती मेट्रिक टन सरासरी ऊस तोडणी व वाहतूक दर 846.25 रुपये आहे. टोकाई सहकारी साखर कारखाना लि. कुरूंदा ता. वसमतनगर या कारखान्याचा प्रती मेट्रिक टन सरासरी ऊस तोडणी व वाहतूक दर 890.36 रुपये आहे. शिऊर साखर कारखाना प्रा. लि. वाकोडी, ता कळमनुरी या कारखान्याचा प्रती मेट्रिक टन सरासरी ऊस तोडणी व वाहतूक दर 910.72 रुपये आहे. वरील कारखान्याचा ऊसतोडणी व वाहतूक खर्च हा वाजवी असल्याची खात्री करुन गाळपास ऊस देताना शेतकऱ्यांनी जवळच्या कारखान्याची निवड करावी. सरासरी ऊसतोडणी व वाहतूक खर्च जर शेतकऱ्यांना जास्त वाटत असेल तर संबंधित कारखान्याच्या कार्यक्रमानुसार शेतकऱ्यास स्वत: ऊसतोडणी करुन तो गाळपासाठी नेता येईल. याकडेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन प्रादेशिक सहसंचालक (साखर) विश्वास देशमुख यांनी केले आहे. ******

No comments: