08 March, 2017

सन 2017 करीता जिल्ह्यास 7 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
      - जिल्हाधिकारी अनिल भंडारी

        हिंगोली, दि.8: गतवर्षीच्या 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये मिळालेले यश उल्लेखनीय असून वृक्षरोपणाची ही गती वाढवून मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने पुढील तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यानुसार राज्यात सन-2017 मध्ये 4 कोटी तर हिंगोली जिल्ह्यास 7 लाख 1 हजार 300 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.
            जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवड या विषयावार आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी हिंगोली जिपचे एसआरपीएफचे एन.एम. मिठ्ठेवाड, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देशमुख, वन विभागाचे केशव साबळे, उप प्रादेशि परिवहन अधिकारी अशोक पवार, जिल्हा उपनिबंधक श्री. निकम सा.बां.कार्यकारी अभियंता एच.जी. देशपांडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाबसाहेब रोडगे, पोलिस निरिक्षक पंडित राठोड, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक एस. बी. तोरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी श्री. भंडारी म्हणाले की,  ग्लोबल वार्मिंगमुळे होणारी तापमानातील वाढ किंवा अचानक हवामान आणि ऋतूत होणाऱ्या बदलाबाबत पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण याबाबत विविध कार्यक्रम सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात सर्वत्र्‍ वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. जुलै-2016 मध्ये शासनाने राबविलेल्या 2 कोटी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रमात शासनाच्या विविध विभागासह शाळा, महाविद्यालय, एन.एस.एस., स्काऊट ॲन्ड गाईडस्, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक समूह, लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण संस्था, सहकारी संस्था, सामान्य नागरिक यांच्या सहभागामुळे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जिल्ह्यात 5 लक्ष 33 हजार 837 वृक्ष लागवड तर  राज्यात 2 कोटीहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली होती.
            त्यानुसार राज्यात पुढील तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून, सन 2017 मध्ये 4 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तर सन 2018 मध्ये 13 कोटी आणि सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्षांची लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्याला सन 2017 करीता 7 लाख 1 हजार 300 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यात विभागीय वन अधिकारी, वन विभाग, हिंगोली यांना 3 लाख 38 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तर सामाजिक वनीकरण विभाग, हिंगोली यांना 35 हजार, जिल्हाधिकारी कार्यालय 1 हजार, ग्राम विकास , जिल्हा परिषद 24 हजार, अधिक्षक अभियंता महावितरण मंडळ 300, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था 2 हजार 500, पोलीस अधीक्षक कार्यालय 1 हजार 500, प्रक्षेत्र व्यवस्थापक वळू माता प्रक्षेत्र 100, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 100, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी (कृषी विभाग) 70 हजार , समादेश रा. रा. पोलीस बल गट क्र. 12 एक हजार, जिल्हा शल्य चिकित्सक , सामान्य रुग्णालय  पाचशे, उपविभागीय अभियंता , जलसंपदा विभाग, हिंगोली 1 हजार ,व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र- एक हजार, उपविभागीय अभियंता जलसंपदा विभाग, हिंगोली एक हजार, मुख्याधिकारी नगर पालिका, हिंगोली एक हजार  , मुख्याधिकारी नगर पालिका, कळमनुरी - एक हजार, मुख्याधिकारी नगर पालिका वसमत एक हजार, मुख्याधिकारी नगर पालिका सेनगाव -एक हजार , व्यवस्थापक, रेल्वे विभाग, हिंगोली एक हजार, आगार प्रमुख बसस्थानक , हिंगोली - दोनशे, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन विभाग, हिंगोली -एक हजार , कार्यकारी अभियंता, लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली -एक हजार , सहाय्यक अभियंता श्रेणी 1 सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्र. 3 हिंगोली –एक हजार, उपमंडळ अभियंता (समूह) भारत संचार निगम लिमिटेड, हिंगोली - शंभर , व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग – एक हजार असे एकूण 7 लाख 1 हजार तीनशे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे.
****  

No comments: