विशेष जिल्हा युवा पुरस्काराकरिता
युवा/महिला मंडळानी अर्ज करावेत
हिंगोली, दि. 17 : भारत सरकारच्या
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरु युवा केंद्र, हिंगोली
कार्यालयाव्दारा जिल्ह्यातील नोंदणीकृत युवा / महिला मंडळाकडून विशेष जिल्हा युवा पुरस्कार
2016-17 अशा जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी दि. 21 मार्च, 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात
येत आहे.
सदरील पुरस्काराचे स्वरूप रु. 25 हजार
(रुपये पंचवीस हजार फक्त) व प्रमाणपत्र असे आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या युवा
मंडळाच्या प्रस्तावाचा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. तरी सामाजिक, शैक्षणिक,
सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरणरक्षण व राष्ट्रीय अशा विविध विकासात्मक कार्यक्रम राबविणाऱ्या
युवा/महिला मंडळानी आपला विहित नमुन्यातील अर्ज दि. 21 मार्च, 2017 पर्यंत नेहरु युवा
केंद्र, 26, देवडा नगर, नांदेड नाका, हिंगोली येथे सादर करावा, असे आवाहन नेहरु युवा
केंद्राच्या जिल्हा युवा समन्वयक, चंदा रावळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment