29 March, 2017

अनुसूचित जमातीच्या बचत गटानी पोल्ट्री फॉर्म स्थापन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 29 :- विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत खालील दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात उपलब्ध असुन इच्छूक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांचे नावे योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दर्शविल्याप्रमाणे परिपुर्ण कागदपत्रांसह आवेदन अर्ज दि. 17 एप्रिल, 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले व परिपुर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
जनउत्कर्ष, जनउत्थान महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत स्थापन करण्यात आलेल्या अथवा नव्याने स्थापित झालेल्या आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटांना व्यवसायाकरिता पोल्ट्री फार्म स्थापन करून देणे व प्रशिक्षण देणे. सामुहिक स्वरूपाची योजना असल्याने पुढील आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. 1) आदिवासी स्वयंसहायता बचतगट हे जनउत्कर्ष, जनउत्थान महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत स्थापन करण्यात आलेल्या नव्याने स्थापित झाल्याबाबतचे नोंदणीकृत प्रमाणपत्र जोडावे, 2) बचत गटातील सर्व सभासद हे आदिवासी असावेत त्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र जोडावे, 3) बचत गटातील कमीत कमी एका लाभार्थ्याकडे एक एकर जमीन, बारामाही पाणी, वीज इत्यादी सुविधा असल्याचे कागदपत्र. (सातबारा, विहिर नोंद, मोटार (वीजपंप) प्रमाणपत्र, चालु वर्षातील वीजबिल, होल्डींग), 4) पोल्ट्रीफॉर्मसाठी घ्यावयाचे क्षेत्र / जमीन बचत गटाला किमान 5 वर्ष वापरण्यास देत असल्याबाबत जमीन मालकाचे व बचत गटातील सर्व सदस्य यांनी शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर रजिस्टर हमीपत्र जोडावे, 5) बचतगटाचे चालु व्यवहार असलेले पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी, 6) रहिवासी प्रमाणपत्र, 7) ओळखपत्र प्रमाणपत्र, 8) सदर योजनेचा यापुर्वी लाभ घेतल्याचे प्रमाणपत्र, 9) दोन पासपोर्ट साईज फोटो.

*****

No comments: