मृदा परिक्षक (मिनीलॅब)
कृषि विभागाच्या योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 18 : खतांच्या समतोल
वापरास व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनास चालना मिळण्यासाठी सन 2015-16 पासून राष्ट्रीय
शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृद आरोग्य पत्रिका योजना कृषि विभागामार्फत राज्यभर राबविली
जात आहे. जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेत जमीनीचे रासायनिक गुणधर्म,
प्रमुख अन्नद्रव्याची पातळी व सुक्ष्म अन्नद्रव्य कमतरता स्थितीची माहिती शेतकऱ्यांना
देण्यात येते, यापुढील काळात माती परिक्षणाची सुविधा ग्राम, मंडळ अथवा तालुकास्तरावर
उपलब्ध करून देण्यासाठी कृषि विभागामार्फत इच्छुक संस्था अथवा लाभधारकांना मृदा परिक्षक
(मिनीलॅब) खरेदीकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कृषि आयुक्तालयाकडून खाजगी संस्था
/ लाभधारकांसाठी हिंगोली जिल्ह्याकरिता 38 मृदा परिक्षक (मिनीलॅब) करिता अनुदान उपलब्ध
करून देण्यात आले आहे. खाजगी संस्था/लाभधारकांना मृदा परिक्षक (मिनीलॅब) खरेदीसाठी
एकूण किमतीच्या 60 टक्के जास्तीत-जास्त रु. 45 हजार इतके अनुदान देय राहील. इच्छूक
संस्था अथवा लाभधारकांनी त्यांचे प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, हिंगोली
येथे दि. 22 मार्च, 2017 रोजीपर्यंत सादर करावयाचे आहे. प्राप्त प्रस्तावामधून मृद
परिक्षक (मिनीलॅब) चालविण्यासाठी जिल्ह्यातील संस्था अथवा लाभधारकांची निवड जिल्हास्तरावर
जमीन आरोग्य पत्रिका योजनेंतर्गत मा. जिल्हाधिकारी, हिंगोली यांचे अध्यक्षतेखाली गठीत
करण्यात आलेल्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या संस्था अथवा
लाभधारकांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडून पुर्वसंमती प्राप्त झाल्यानंतरच
मृदा परिक्षक (मिनीलॅब) खरेदी करावयाचे असून अनुदानाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर
(डिबीटी) अंतर्गत प्रत्यक्ष लाभधारकांच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर जमा करण्यात
येणार आहे.
खाजगी संस्था लाभधारकाने भारतीय
कृषि संशोधन संस्था (आय.सी.ए.आर.नवी दिल्ली) यांचेकडून विकसित मृदा परिक्षक (मिनीलॅब)
खरेदी करणे बंधनकारक आहे, संस्थेची अथवा लाभधारकांची निवड करतांना सर्व साधारणपणे संस्थेचे
अथवा लाभधारकांचे कृषि क्षेत्राशी संबंधित कार्य, उपलब्ध तांत्रिक मनुष्यबळ, जागेची
उपलब्धता, उपलब्ध संगणक व इंटरनेट सुविधा इत्यादी बाबी विचारात घेऊन करण्यात येणार
आहे. मृदापरिक्षक (मिनीलॅब) चा लाभ साधारणपणे
जिल्ह्यातील सर्व भागामध्ये होईल यादृष्टीने मंडळ व तालुकानिहाय लाभार्थ्यांची निवड
करण्याता येईल. मृदा परिक्षक (मिनीलॅब) यांचेवर
तांत्रिक नियंत्रण संबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी यांचे राहिल. मृदापरिक्षक
(मिनीलॅब) कार्यरत ठेऊन शेतकऱ्यांना माती परिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत हमीपत्र
लाभार्थी संस्था करणेसाठी एकदाच अनुदान देण्यात येईल. तदनंतरच्या अनुषंगित/आवर्ती खर्चासाठी
शासनाकडून कोणतेही अनुदान देण्यात येणार नाही परंतू जमीन आरोग्य पत्रिका योजनेंतर्गत
तपासणीकरिता देण्यात येणाऱ्या मृद नमुन्यांसाठीचा शासनाने निर्धारित केलेले तपासणी
शुल्क शेतकऱ्यांकडून घेण्याची अनुमती संस्थेस / लाभधारकास असेल. मृद परिक्षक (मिनीलॅब)
अंतर्गत निवड झालेल्या संस्थेने / लाभधारकांने तपासणी केलेले नमुने व वितरीत जमीन आरोग्य
पत्रिकांचा मासिक प्रगती अहवाल तालुका कृषि अधिकारी यांचेकडे सादर करणे बंधनकारक राहील,
लाभार्थी संस्था अथवा लाभधारकाने शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका मराठी भाषेतून उपलब्ध
करून देणे व केंद्र शासनाच्या एम.आय.एस. (सॉईल हेल्थ कार्ड पोर्टल) वरती माहिती भरणे
बंधनकारक असेल मृद नमुने तपासणीचा शेतकरी निहाय डेटा सॉप्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवणे
कर्मचाऱ्यांचे तांत्रिक प्रशिक्षण, मृद परिक्षक (मिनीलॅब) ची देखभाल दुरूस्ती, मृद नमुने तपासणीकरिता रसायन
रिलींग करणे मृद नमुने आवक नोंदविणे व जमीन आरोग्य पत्रिका वाटप जावक नोंदवही, रसायन
वाटप नोंदवही इत्यादी बाबी संबंधित संस्था अथवा लाभधारकाने करावयाचे आहे.
तरी जिल्ह्यातील इच्छूक संस्था/लाभधारकांनी
दि. 22 मार्च, 2017 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय,
हिंगोली येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी व्हि. डी. लोखंडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment