09 March, 2017

क्रीडा विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 9 :  भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय नवी दिल्ली, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, ध्यानचंद गौरव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार 2017 साठी अर्ज मागविण्यात आले असून केंद्र शासनामार्फत सदरील पुरस्कार दिले जातात. सदरील पुरस्कार अर्ज हे दि. 28 एप्रिल, 2017 पर्यंत शासनास सादर करावयाचे आहे.
तरी दि. 12 एप्रिल, 2017 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

*****  

No comments: