उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमुर्ती ता. वि. नलवडे यांचा दौरा कार्यक्रम
हिंगोली,दि.३:- हिंगोली येथे जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीच्या भूमीपूजन व
पायाभरणी सोहळा उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमुर्ती ता. वि. नलवडे यांच्या हस्ते होणार असून, न्यायमुर्ती नलवडे यांचा दौरा कार्यक्रम
पुढील प्रमाणे राहाणार आहे.
शनिवार दि. 4 फेब्रूवारी, 2017 रोजी न्यायमुर्ती नलवडे हे औरंगाबाद
येथून दूपारी २ वाजता हिंगोलीकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व
मुक्काम करतील. रविवार दि. 5 फेब्रूवारी, 2017 रोजी सकाळी १० वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक
कार्यालयाजवळ सदर प्रस्तावित नवीन जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा भुमीपूजन व
पायाभरणी सोहळ्यास उपस्थित राहतील. दूपारी २ वाजता औरंगाबादकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment