02 March, 2017

क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्‍यावतीने
 भांडेगाव येथे दोन दिवसीय महिला आणि किशोरींसाठी
आरोग्‍य जनजागरण अभियानाचे आयोजन
विवीध स्‍पर्धा, रॅली, मार्गदर्शन, प्रदर्शनी तसेच तपासणी शिबीराचा समावेश 
हिंगोली , दि. 02 - केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीने जिल्‍हयातील भांडेगाव येथे माता-बाल आरोग्‍य, किशोरवयीन आरोग्‍य या विषयावर दोन दिवसीय राष्‍ट्रीय आरोग्‍य जनजागरण अभियानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. दि. 03 आणि 04 मार्च रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या या अभियानात विवीध स्‍पर्धा, मार्गदर्शन, तपासणी शिबीर, रॅली,  प्रदर्शनी, माहितीपट प्रदर्शन, आदी उपक्रमांच्‍या माध्‍यमातून योजनांची जनजागृती करण्‍यात येणार आहे.
शुक्रवार दि. 03 मार्च रोजी  भांडेगाव येथील ग्रामपंचायत सभागृहात किशोरवयीन मुलींसाठी माहितीपटाच्‍या माध्‍यमातून आरोग्‍य विषयक माहिती देण्‍यात येणार आहे. तसेच महिला तज्ञाच्‍या माध्‍यमातून आरोग्‍य  विषयक मोकळया संवादाचे आयेाजन करण्‍यात आले आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमानंतर त्‍यांची आरोग्‍य तपासण होणार असून मोफत औषधांचे वाटप देखिल करण्‍यात येणार आहे.
येथील सुखदेवानंद विदयालयाच्‍या विदयार्थीनींच्‍या सहभागाने संदेशात्‍मक रांगोळी स्‍पर्धा होणार असून अंगणवाडीच्‍या माध्‍यमातून शुन्‍य ते तीन वयोगटातील बालकांसाठी सुदृढ बालक स्‍पर्धा होणार आहे.
या दोन दिवसीय अभियानाच्‍या मुख्‍य कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. 04 मार्च रोजी मान्‍यवरांच्‍या उपस्‍थीतीत करण्‍यात येणार असून प्रारंभी सुखदेवानंद विदयालय आणि ग्रामस्‍थांच्‍या सहभागाने जनजागरण रॅली काढण्‍यात येणार आहे. तर आरोग्‍यतज्ञाच्‍या माध्‍यमातून माता- आरोग्‍य , किशोरवयीन आरोग्‍य  या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. तर आरोग्‍य आणि सामाजिक स्‍थीती या विषयावर विशेष मार्गदर्शन होणार आहे.  मार्गदर्शनावर आधारित प्रश्‍नमंजुषा प्रतियोगिता घेण्‍यात येणार आहे. आरोग्‍य विभागाच्‍या वतीने आरोग्‍य तपासणी शिबीर आणि औषधवाटप कार्यक्रमाचे तर बालविकास प्रकल्‍प विभागाच्‍यावतीने पोषण आहार प्रात्‍यक्षिकांच्‍या प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाला भांडेगाव परिसरातील जनतेने मोठयासंख्‍येने उपस्‍थीत राहण्‍याचे आवाहन संचालनालयाचे सुमित दोडल,  संजय तिवारी, जिल्‍हा संगोपन अधिकारी डॉ. सतिष रूणवाल, बालविकास प्रकल्‍प अधिकारी गणेश वाघ आदींनी केले आहे.

****  

No comments: