17 March, 2017

जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
हिंगोली, दि. 17 :  युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत असणाऱ्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने दि. 17 मार्च, 2017 रोजी जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घघाटन सारिका पेंशनवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सय्यद जब्बार पटेल, हिंगोली श्री. गुडेवार, साजिया पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्ह्यातील युवक मंडळांच्या सांस्कृतिक संचांनी आपली कला सादर केली. नेहरु युवा केंद्राच्या कार्यक्रमासंदर्भात व या उपक्रमाबद्दल जिल्हा युवा समन्वयक चंदा रावळकर यांनी युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी युवकांनी आपल्या सस्कृतीचे दर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी प्रयत्नशिल राहावे व युवा शक्तीने राष्ट्राप्रती आपले योगदान समर्पित करावेअसे आपल्या मनोगतात सांगितले.
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विविधांगी दर्शन घडविण्यात आले. यामध्ये युवक-युवतींनी, युवक मंडळ, महिला मंडळ यांनी ही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
नेहरु युवा केंद्राने केलेल्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील मान्यवर व उपस्थितांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे कौतूक केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेहरु युवा केंद्राच्या वतीने भगवान चंद्रवंशी, नामदेव सपाटे, मारोती चंद्रवंशी, खंडूजी वाबळे, सुमय्या पठाण, नामदेव वाबळे, आकाश चेंडके, शिवानंद नरवाडे, आदिंनी परिश्रम घेतले.

***** 

No comments: