08 March, 2017



इसापूर उजवा व डावा कालव्याच्या क्षेत्रातील लाभधारकांनी
पाणी पट्टी वेळेत भरण्याचे आवाहन
हिंगोली, दि.8 : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजवा कालवा 119 किमी व इसापूर डावा कालवा 84 किमी पर्यंत वितरण व्यवस्थे अंतर्गत उन्हाळी हंगाम सन 2016-17 मध्ये तीन आवर्तने मार्च ते जुन 2017 दरम्यान लाभधारकांच्या मागणीनुसार देणे प्रस्तावित होते.
            परंतू लाभधारकाकडील थकीत रक्कम व अग्रीम पाणी पट्टीच्या रक्कमेबाबत मागणी करूनही शाखा कार्यालयात भरणा होत नाही. त्यामुळे उन्हाळी हंगाम सन 2016-17 राबविण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
            तरी लाभधारकांनी  त्यांच्याकडील मागील थकबाकीच्या 1/3 व चालु हंगामाची 50 टक्के अग्रीम रक्कम संबंधीत शाखा कार्यालयास भरणा करून रितसर पावती हस्तगत करून शासन महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागास सहकार्य करावे. अन्यथा उन्हाळी हंगाम सन 2016-17 मध्ये पाणी सोडता येणे शक्य होणार नाही. यांची लाभधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र.1, नांदेडचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****

No comments: