मुद्रा बँक योजनेचा लाभ घेवुन स्वंयरोजगार सुरु करा
-- पी. आर. शिंदे
हिंगोली, दि.29: प्रधानमंत्री
मुद्रा बँक योजनेचा जास्तीत-जास्त प्रचार-प्रसार करत स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरु
करु इच्छिणाऱ्या या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी देखील
नौकरीच्या मागे न धावता मुद्रा बँक योजनेचा लाभ घेवून स्वंयरोजगार सुरु करावा असे
प्रतिपादन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी. आर. शिंदे यांनी केले.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना
स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी विनातारण सहज कर्ज उपलब्ध करून
देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रसार, प्रचारासाठी जिल्हास्तरीय
मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व बँक ऑफ
महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजन करण्यात आलेल्या प्रधानमंत्री
मुद्रा बँक योजना मेळाव्यात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग
केंद्राचे एच. एस. साखरे, ग्रामीण स्वंयरोगजार प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्रीकांत
दिक्षीत, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे
शाखाधिकारी लक्ष्मीकांत भालेराव यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री.
शिंदे म्हणाले की, स्वयंरोजगार सुरु करु इच्छिणाऱ्या होतकरु युवक-युवतींसाठी
केंद्र शासानाने सुरु केलेली प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना अतिशय लाभदायी आहे.
स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करणाऱ्यासाठी या योजनेतंर्गत कर्ज उपलब्ध करुन दिले
जाते. जिल्ह्यातील 1268 लाभार्थ्यांना मुद्रा बँक योजनेतंर्गत सुमारे 20 कोटी
रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आल्याचे ही श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
जिल्हा माहिती
अधिकारी अरुण सुर्यवंशी म्हणाले की, मुद्रा बँक योजनेमुळे उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या
युवक-युवतींचे स्वप्न साकार होणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी
या मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेअंतर्गत शिशु, किशोर आणि तरुण या गटाकरीता
५० हजार ते १० लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. या योजनेतंर्गत कर्ज
घेण्यास अडचण निर्माण झाल्यास किंवा तक्रार नोंदणी करावयाची असल्यास जिल्हास्तरीय
मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे समन्वयक जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा अग्रण
बँकेचे व्यवस्थापक यांच्याकडे करावी.
प्रधानमंत्री
रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत 126 प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना
मुद्रा बँक योजनेचा लाभ देण्याचे उद्ष्टि होते. त्यापैकी 92 लाभार्थ्यांना मुद्रा
बँक योजनेचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. साखरे यांनी यावेळी दिली.
मुद्रा बँक
योजनेतंर्गत किशोर गटातील 17 आणि तरुण गटातील 13 अशा एकुण 30 लाभार्थ्यांना 30 लाख
रुपयांचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती बँक ऑफ महाराष्ट्रचे
शाखाधिकारी लक्ष्मीकांत भालेराव यांनी यावेळी दिली.
मुद्रा बँक योजनेतंर्गत
यावेळी श्रीमती फरीदा बेगम अकबर, सय्यद कलीम सय्यद फईम आणि साजीद बाबु शेख या
लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी मेळाव्यास
नागरिक आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी - कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment