अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील
विद्यार्थ्यांनी
भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
हिंगोली, दि. 18 : दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक
महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या
प्रमाणात, राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना
सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. शासकीय
वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश
देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात.
अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन,
निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक
रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये
थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू
केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10 वी / 12 वी / पदवी / पदवीका परीक्षेमध्ये
60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के असेल. विहित नमुन्यातील अर्ज व जोडपत्र तसेच शासन
निर्णय दिनांक 06 जानेवारी, 2017 या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली
होती परंतु सदर अर्ज स्विकृतीसाठी दिनांक 23 मार्च, 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात
आलेली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित
जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर (इयत्ता 11 वी, पदवी, पदव्युत्तर पदवी) शिक्षण
घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी
लागणारी देय रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये नियमानुसार
वितरीत करण्यात येईल.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष,
अटी व शर्ती या अर्जासोबत जोडलेल्या आहेत. त्याचे विद्यार्थी व पालकांनी अवलोकन करावे.
निकष, अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच अर्ज भरावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
अर्जाचा विहीत नमुना https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in
, https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
तो संकेतस्थळावरून
डाऊनलोड करून घ्यावा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह तो
विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्हयातुन काढलेले आहे त्या-त्या
तालुक्यातील खालील गृहपाल यांचेकडे अर्ज दिनांक 23 मार्च 2017 पर्यंत दाखल करावेत.
अ.क्रं.
|
गृहपालाचे व
वसतिगृहाचे नाव.
|
तालुका
|
भ्रमणध्वनी
क्रमांक
|
1
|
श्री.आर. एस. भराडे-गृहपाल, डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली.
|
हिंगोली
|
9096682610
|
2
|
श्रीमती एस. आर. राठोड- गृहपाल, मागासवर्गीय
मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली.
|
हिंगोली
|
9822009802
|
3
|
श्री. यु. एच. जाधव-गृहपाल, डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,वसमत.
|
वसमत.
|
8390864982
|
4
|
श्रीमती के. डी. सुकळकर, गृहपाल, मागासवर्गीय
मुलींचे शासकीय वसतिगृह,वसमत.
|
वसमत.
|
7775960916
|
5
|
श्री. जी. व्हि. बिहाडे, गृहपाल,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,कळमनुरी.
|
कळमनुरी.
|
8275108095
|
6
|
श्रीमती के. डी. सुकळकर, गृहपाल, मागासवर्गीय
मुलींचे शासकीय वसतिगृह,वसमत.
|
कळमनुरी.
|
7775960916
|
7
|
श्री. एस. आर. माळी-गृहपाल, मागासवर्गीय
मुलांचे शासकीय वसतिगृह, सेनगांव.
|
सेनगांव
|
7350650720
|
8
|
श्री. एम. आर. राजुलवार-भा.स.शि.विभाग,
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली
|
औंढा ना.
|
9665730222
|
अपूर्ण भरलेले अर्ज आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे नसलेले
अर्ज रद्द समजण्यात येतील. 60 टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज
विचारात घेतले जाणार नाहीत. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
ही मर्यादा 50 टक्के असेल. जिल्हानिहाय अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती
विद्यार्थ्यांना हा लाभ द्यावयाचा ही संख्या निश्चित केलेली असून त्यापेक्षा जास्त
अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. निवडयादी संबंधीत जिल्ह्याचे
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत प्रसिध्द केली जाईल. निवड न झालेल्या
विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही. सदर अर्ज भरण्याची अखेरची मुदत दि. 23
मार्च, 2017 पर्यंत असेल. तरी हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सदर
योजनेचा लाभ घेणेसाठी उपरोक्तप्रमाणे अर्ज सादर करावेत, अधिक
माहितीसाठी संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क
साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment