राष्ट्रीय युवा दल पदाच्या प्रत्यक्ष
मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 17 : नेहरु युवा केंद्र, हिंगोली युवा कार्य व क्रीडा
मंत्रालय भारत सरकार या कार्यालयात वर्ष 2017-18 साठी “ राष्ट्रीय युवा स्वयंसेवक” या पदासाठी युवक-युवतींची निवड करावयाची आहे. याकरिता
वर्तमानपत्रातून जाहिरात देण्यात आलेली असून त्यानुसार कार्यालयात ज्या उमेदवारांनी
अर्ज केलेले आहेत. ज्या उमेदवारांनी कार्यालयात अर्ज केलेले आहेत. अशा पात्र उमेदवारांनी
आपले मुलाखतीचे पत्र कार्यालयातून प्राप्त करावे. आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दि.
22 मार्च, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता आपल्या सर्व मुळ प्रमाणपत्रांसह जिल्हाधिकारी
कार्यालय, हिंगोली येथे स्व खर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या
जिल्हा युवा समन्वयक, चंदा रावळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment