29 September, 2020

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 01 लाख 75 हजार 234 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण

 

       

       * जिल्ह्यात सर्वेक्षणाचे 74 टक्के उद्दिष्ट साध्य.

 

हिंगोली दि. 29: कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत 1 हजार 222 पथकामार्फत 01 लाख 75 हजार 234 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करुन 74 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक कुटुंबातील मिळून 08 लाख 86 हजार 89 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 589 कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता 103 पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांना उपचारासाठी संदर्भीत करण्यात आले आहेत. तसेच सारी आजाराची 148 रुग्ण तर मधुमेहाची 3 हजार 703, उच्च रक्तदाबाची 6 हजार 792 किडनी आजाराची 55, लिव्हर आजाराचे 17 व इतर आजाराचे 3 हजार 610 रुग्ण या तपासणीत आढळून आली आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तालुकानिहाय तपशील पुढील प्रमाणे आहे.

हिंगोली तालुक्यात 200 पथकांमार्फत 46 हजार 419 कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 2 लाख 30 हजार 641 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये मधुमेहाची 571 तर उच्चरक्तदाबाची 592 आणि इतर आजाराची 1 हजार 449 रुग्ण आढळून आली आहेत. वसमत तालुक्यातील 244 पथकांमार्फत 43 हजार 262 कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 2 लाख 46 हजार 922 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  या तपासणी मध्ये 158 कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता 37 पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सारी आजाराची 02 रुग्ण तर मधुमेहाची 1 हजार 039, उच्चरक्त दाबाची 3 हजार 618 किडनी आजाराची 14, लिव्हर आजाराचे 11 व इतर आजाराचे 1 हजार 111 रुग्ण या तपासणीत आढळून आली आहे. कळमनुरी तालुक्यातील 191 पथकांमार्फत 27 हजार 808 कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 1 लाख 35 हजार 431 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  या तपासणी मध्ये 93 कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता 22 पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सारी आजाराची 113 रुग्ण तर मधुमेहाची 643, उच्च रक्त दाबाची 1 हजार 025 किडनी आजाराची 01 व इतर आजाराचे 241 रुग्ण या तपासणीत आढळून आली आहेत. सेनगांव तालुक्यातील 65 पथकांमार्फत 31 हजार 568 कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 1 लाख 49 हजार 487 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  या तपासणी मध्ये 244 कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता 40 पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सारी आजाराची 33 रुग्ण तर मधुमेहाची 346, उच्चरक्त दाबाची 471, किडनी आजाराची 34, लिव्हर आजाराचे 02 व इतर आजाराचे 230 रुग्ण या तपासणीत आढळून आली आहे आणि औंढा तालुक्यातील 522 पथकांमार्फत 26 हजार 177 कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 1 लाख 23 हजार 608 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  या तपासणी मध्ये 94 कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता 04 पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मधुमेहाची 1 हजार 104, उच्चरक्त दाबाची 1 हजार 086, किडनी आजाराची 06, लिव्हर आजाराचे 04 व इतर आजाराचे 579 रुग्ण या तपासणीत आढळून आली आहेत.

‘कोविड मुक्त महाराष्ट्र’ ही जनजागरण मोहिम राज्यभर शासनाच्या वतीने राबविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणा-या या मोहिमेत गावे, तांडे, वस्त्या, प्रभागातील प्रत्येक घराला भेट देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्याता आली आहेत. खोकला, ताप, दमा लागने अशी कोविड सदृश्य लक्षणे असणा-या रुग्णांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भीत केले जात आहे तसेच विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

 

*****

 

 

No comments: