हिंगोली,दि.21 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण
कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात कोटपा कायदा-2003 अधिक प्रभावीपणे राबविण्याकरिता व
सर्व शासकीय कार्यालये, सर्व आरोग्य संस्था, तंबाखू मुक्त करण्यासाठी आणि
जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयात ऐलो लाईन अभियान (YELLOW LINE CAMPAIGN) राबविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी यांच्या
अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दि. 22 सप्टेंबर, 2020 रोजी ठिक दुपारी 04.00
वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
संबंधीत विभागांनी या बैठकीस वेळेवर
उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
****
No comments:
Post a Comment