जिल्ह्यात
कोविड-19 चे नवीन 11 रुग्ण ; तर 15
रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
· 187 रुग्णांवर उपचार सुरु
·
हिंगोली,दि.2: जिल्ह्यात 11 नवीन कोविड-19 रुग्णांचा
अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास
यांनी आज दिली आहे.
आज
प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 5 व्यक्ती, वसमत
परीसरात 6 व्यक्ती असे एकूण 11 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर
आज 15 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य
रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 8 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने
त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 3 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर
असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 11 रुग्णांची
सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु
आहेत.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 1 हजार 513 रुग्ण झाले असून, त्यापैकी 1 हजार 306 रुग्ण
बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 187
रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 20 व्यक्तींचा
मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली
आहे.
****
No comments:
Post a Comment