जिल्ह्यात
कोविड-19 चे नवीन 32 रुग्ण ; तर 27 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
· 192 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली,दि.3: जिल्ह्यात 32 नवीन कोविड-19 रुग्णांचा
अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास
यांनी आज दिली आहे.
आज
प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे वसमत परीसरात 5 व्यक्ती आणि औंढा
परिसरात 1 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसर 21 व्यक्ती, औंढा
परिसर 5 व्यक्ती असे एकूण 32 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले
आहेत. तर आज 27 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज
देण्यात आला.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य
रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 8 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने
त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 3 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर
असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 11 रुग्णांची
सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु
आहेत.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 1 हजार 545 रुग्ण झाले असून, त्यापैकी 1 हजार 333 रुग्ण
बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 192
रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 20 व्यक्तींचा
मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment