हिंगोली,
दि. 8 : हिंगोली
शहरातील जिल्हा परिषद वसाहत, हेमराज
गल्ली, मस्तानशहा नगर, विवेकानंद नगर, कपडा गल्ली, रिसाला बाजार, सावरकर नगर तर
हिंगोली तालुक्यातील भोगाव, आंबाळा, शिक्षक कॉलनी बळसोंड, रामाकृष्णा सिटी आणि वसमत
शहरातील बँक कॉलनी, ब्राह्मण गल्ली तर वसमत तालुक्यातील बाराशिव, परळी, आरळ,
पळसगांव, कन्हेरगाव आणि अकोली या ग्रामीण क्षेत्रात कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने
कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी वरील प्रमाणे नमूद संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट
झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
तसेच
कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा व कनका या गावात कोविड-19 चे रुग्ण आढळून
आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी या क्षेत्रातही कंटेनमेंट
झोन घोषित करण्यात आले आहे.
या
सर्व कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत.
या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना
आवश्यक त्या सेवा नगर परिषद, ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात
येणार आहेत.
या
आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम
188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे
आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment