जिल्ह्यात
कोविड-19 चे नवीन 48 रुग्ण; तर 44 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
· 473 रुग्णांवर उपचार सुरु, तर
दोघांचा मृत्यू
हिंगोली,दि.13.: जिल्ह्यात 48 नवीन कोविड-19 रुग्णांचा
अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास
यांनी आज दिली आहे.
आज
प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 4 व्यक्ती
आणि सेनगाव परिसर एक व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली
परिसरात 26 व्यक्ती, वसमत परिसरात 12, औंढा परिसर एक व्यक्ती तर सेनगाव परिसर 4
व्यक्ती असे एकूण 48 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 44 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने
त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज दोन कोव्हिड -19 रुग्णांचा मृत्यू
झाला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य
रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 23
रुग्णांची प्रकृती
गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 7 रुग्णांची प्रकृती
अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 30 रुग्णांची
सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु
आहेत.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 118 रुग्ण झाले असून, त्यापैकी 1 हजार 619 रुग्ण
बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 473 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे
जिल्ह्यात आतापर्यंत 26 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक
किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment