09 September, 2020

विकेल ते पिकेल, बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अभियानाचा 10 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 

विकेल ते पिकेल, बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अभियानाचा

10 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

            हिंगोली, दि. 9 : विकेल ते पिकेल, बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अभियान (स्मार्ट)  कार्यक्रमाचा शुभारंभ व शेतकरी संवादाचे दि. 10 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 12.00 ते 1.30 वाजता आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे या अभियानाचा शुभारंभ करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा, उपविभाग, तालुका तसेच गावपातळीवर करण्यात येणार आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे.

            या कार्यक्रमाचे आयोजन कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी ग्राम पातळीवर कृषि विभागाच्या युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची ऑनलाईन लिंक youtube link http://www.youtube.com/c/agricultureDepartmentGom ही असून  शेतकऱ्यांना घरच्या घरी त्यांच्या मोबाईलवर सुध्दा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारणाचा लाभ घेता येणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम,  फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच कृषि सचिव एकनाथ डवले यांची उपस्थिती राहणार आहे.

            सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी. शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व्ही. डी. लोखंडे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे यांनी केले आहे.

00000

No comments: