30 September, 2020

एमएचटी-सीईटी 2020 प्रवेश परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू

 


 

हिंगोली,दि.30: शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकीय, औषध निर्माणशास्त्र व कृषि तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी 2020 ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने हिंगोली जिल्ह्यात मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतन लिंबाळा, हिंगोली येथे दिनांक 1 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत  सकाळी 7.30 ते दुपारी 12.00 प्रथम सत्र, दुपारी 12.30 ते सायं. 6.45 पर्यंत द्वितीय सत्र याप्रमाणे परीक्षा घेण्यात येणार आहे. या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात  कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती  हाताळण्यासाठी  परीक्षा केंद्र परिसरात सकाळी 7.00 ते सायं 6.45 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आली आहे.

या परीक्षा उपकेंद्राची इमारत व परिसर यामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बुथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकरी-कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक यांनी बंदोबस्तकामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी ज्यांना परवानी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

 

 

       

 

No comments: