हिंगोली, दि.18: राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला
समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व
पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी
व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक
करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिस-या
सोमवारी किंवा तिस-या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणा-या
कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. या महिला
लोकशाही दिनाचे आयोजन दिनांक 21 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी
11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात करण्यात
आले आहे.
समस्याग्रस्त
व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,
हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित
नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा विषयक, आस्थापना विषयक
बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर, असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
समस्याग्रस्त
व पिडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी
सोडविण्याकरीता करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment