* पात्र अर्जदारांनी कागदपत्रे तपासणी व मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली(जिमाका), दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दि. २२ डिसेंबर २०२५ च्या जाहिराती अन्वये जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांकरिता जाहिरात प्रसिद्ध करून दि. २४ डिसेंबर २०२५ ते दि. ०२ जानेवारी २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र व अपात्र अर्जदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://hingoll.nic.in/) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अनुषंगाने पात्र अर्जदारांची तालुकानिहाय मूळ कागदपत्रांची तपासणी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत करण्यात येणार असून दुपारी १२ ते सायंकाळी ६ या कालावधीत मुलाखती घेण्यात येणार आहेत.
त्यानुसार हिंगोली (शहर) साठी दि. ०३ फेब्रुवारी २०२६, हिंगोली (ग्रामीण) साठी दि. ०४ फेब्रुवारी २०२६, सेनगाव तालुक्यासाठी दि. ०५ फेब्रुवारी २०२६, कळमनुरी तालुक्यासाठी दि. १० फेब्रुवारी २०२६, वसमत तालुक्यासाठी दि. ११ फेब्रुवारी २०२६ तसेच औंढा नागनाथ तालुक्यासाठी दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी कागदपत्र तपासणी व मुलाखती होणार आहेत.
मूळ कागदपत्रांची तपासणी करण्याकरिता सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गैरहजर राहणाऱ्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत मुलाखतीची संधी दिली जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. पात्र अर्जदारांनी अर्जासोबत सादर केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व एक छायांकित प्रतींचा संच सोबत आणून विहित वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित राहावे. नेमून दिलेल्या दिवशी गैरहजर राहिल्यास अर्जाचा विचार न करता उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
No comments:
Post a Comment