समाजकल्याण विभागाचा जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात
• समाज कल्याण विभागाकडून आयोजन
हिंगोली, दि.२०(जिमाका): जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कळमनुरी येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे होत्या.
विद्यार्थी तसेच अधिकारी-कर्मचा-यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने खो-खो, धावणे, रस्सीखेच, क्रिकेट आदी क्रीडा स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
१०० मीटर धावणे स्पर्धेत मुलींमध्ये शुभांगी सिद्धार्थ पंडीत हिने प्रथम तर पुनम दशरथ पाईकराव हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. मुलांमध्ये शुभम दिलीप उबाळे प्रथम व रोहन राजकुमार पाईकराव द्वितीय ठरले.
२०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुलींमध्ये शुभांगी पाईकराव प्रथम तर शितल पंडीत द्वितीय, तर मुलांमध्ये शुभम कांबळे प्रथम व रोहन पाईकराव द्वितीय ठरले. ४०० मीटर धावणे स्पर्धेत मुलींमध्ये पुनम पंडीत प्रथम व लक्ष्मी बेले द्वितीय, तर मुलांमध्ये निखील दांडेकर प्रथम व अनिकेत धुळधुळे द्वितीय आले.
खो-खो स्पर्धेत मुलींमध्ये अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा संघ विजेता ठरला, तर मुलांमध्ये मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सेनगाव संघ विजयी झाला. रस्सीखेच स्पर्धेत अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, कळमनुरी संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
अधिकारी-कर्मचारी धावणे स्पर्धेत श्रीमती गीता गुठठे, सहाय्यक आयुक्त यांनी प्रथम तर श्रीमती एस. व्ही. ढोणे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. बाह्यस्रोत कर्मचारी धावणे स्पर्धेत श्रीमती ज्योती खरोडे प्रथम व श्रीमती शिला खिल्लारे द्वितीय ठरल्या. पुरुष क्रिकेट स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली संघ विजयी झाला.
सांस्कृतिक कार्यक्रमांत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली संघाने उत्कृष्ट देशभक्तीपर नृत्य सादर केले, तर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, वसमत येथील विद्यार्थिनींनी समूह नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. इतर सर्व वसतिगृहातील विद्यार्थ्यांनीही नृत्य व गीतगायनातून आपले कलागुण सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोतीराम फड व राजू ससाने यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद कांगणे यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागातील सर्व शासकीय व बाह्यस्रोत कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
******
No comments:
Post a Comment