21 January, 2026

पीएम-यशस्वी योजना: मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी एनएसपी वर अर्ज नोंदणी करा

हिंगोली, दि. 21(जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत केंद्र पुरस्कृत पीएम यशस्वी योजनेंतर्गत विजा, भज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारची मॅट्रिकपूर्व  तसेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.  

या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आपले अर्ज केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिपच्या https://scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज नोंदणीची अंतिम तारीख ३१ जानेवारी असून, संबंधित शाळा-महाविद्यालयांनी 15 फेब्रुवारीपर्यंत संस्था स्तरावर व्हेरफिकेशन करून घेण्याचे आवाहन  केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थी तसेच संबंधित प्राचार्य व मुख्याध्यापकांनी वेळेत अर्ज व पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी. या संदर्भात काही अडचणी असल्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे. 

**

No comments: