'हिंद की चादर' कार्यक्रमासाठी उद्योजक व व्यापारी संघटनांचे भरीव योगदान
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
हिंगोली, दि.१९ (जिमाका): नांदेड येथे आयेजित 'हिंद की चादर' गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहीदी समागमानिमित्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील उद्योजक-व्यापा-यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अनिल कदम, डॉ. बालाजी भाकरे, डी. सी. नांदे, एस. सी. सावजी तर नंदकिशोर तोष्णीवाल, पंकज अग्रवाल, ज्ञानेश्वर मामडे, रमेश पंडित, राजू जयस्वाल, प्रवीण सोनी, व्दारकादास सारडा, संदीप राठोड, डिगांबर चव्हाण, श्रीरंग राबडे, सुधीर राठोड, राजेश बागडीया व्यापारी-उद्योजक उपस्थित होते.
येत्या २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे होणाऱ्या 'हिंद की चादर' या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी संघटना व नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे विविध स्वरूपात भरीव योगदान देण्याची तयारी दर्शविली.
या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून ५ हजार बिस्कीट पुडे देण्यात येणार आहेत. तर व्यापारी-उद्योजकांकडून टुथपेस्ट, टुथब्रश, साबण, पॅराशुट तेल व कंगवा यांचा समावेश असलेली २ हजार किट, ५० किलो तुरदाळ व ५० किलो बेसन, २० क्विंटल साखर तसेच संकार सिनेमा जाहिरात स्वरूपात सहकार्य मिळणार आहे.
उद्योग संघटनेतर्फे १० क्विंटल तेल, तसेच वैयक्तिक स्वरुपात १.४ क्विंटल पोहे देण्यात येणार आहेत. ३० क्विंटल गहू, ५० किलो चवळी, ५ क्विंटल तांदूळ देणार आहेत.
याशिवाय डिस्पोजेबल ग्लास, वाट्या, डिश, चमचे व प्लेट्स अशा एकूण १ लाख ४० हजार नग साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ३ क्विंटल गूळ व चणादाळ, तर लिकर असोसिएशनकडून ३ क्विंटल साहित्य देण्यात येणार आहे.
कळमनुरीच्या व्यापा-याकडून ५ क्विंटल तूरदाळ, तसेच १० क्विंटल साखर देण्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व उद्योजक, व्यापारी संघटना व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानून, अशा सामूहिक सहभागामुळे “हिंद की चादर” कार्यक्रम अधिक यशस्वी व प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
*****



No comments:
Post a Comment