हिंद-दी-चादर
शहीदी समागम वर्षानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते गौरव
हिंगोली, दि. २० (जिमाका): नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणा-या हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त हिंगोली तालुक्यात केंद्रस्तर व तालुकास्तरावर विविध शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायन, वक्तृत्व, चित्रकला व निबंध लेखन अशा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) श्रीमती दिवाने, शिक्षणाधिकारी (माध्य.) संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथ.) आसावरी काळे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) शेख मोहम्मद तौसिफ, शालेय पोषण आहार योजनेचे अधीक्षक दत्ता नांदे यावेळी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
केंद्र स्तरावरील आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा दि. १५ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान तर तालुकास्तरीय स्पर्धा दि. १९ जानेवारी रोजी जि. प. कन्या प्रशाला, हिंगोली येथे घेण्यात आल्या. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत सरजुदेवी विद्यालयाच्याच कु. नंदिनी वाघमोडे हीने प्रथम तर कु. किरण मांदळे हीने द्वितीय क्रमांकाने पटकावला. भांडेगाव येथील सुखदेवानंद विद्या मंदिरच्या कु. किरण पठाडे हीने तृतीय क्रमांक पटकावला.
गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या कु. अर्चना पाईकराव हीने प्रथम क्रमांक पटकावत तर सरकाळीच्या जि. प. च्या कु. निकीता सोळंके हीने व्दितीय क्रमाकाला गवसणी घातली. कडती येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या कु. प्रतीक्षा पंडित व सरजुदेवी विद्यालयाच्या कु. शुभांगी टेकाळेनेही तृतीय क्रमांक पटकावला. चित्रकला स्पर्धेत कु. समृद्धी घुगे, सरजुदेवी विद्यालय, हिंगोली प्रथम, कु. नंदिनी जाधव, जि. प. प्रा. शा. इंडोळी, व्दितीय आणि प्रतिक भगत, केंद्र प्राथमिक शाळा, फाळेगाव याचा तृतीय क्रमांक आला. निबंध स्पर्धेत (प्राथमिक गट) कु. वैष्णवी सोमोसे, जि.प. प्रा.शा. सरकळी, प्रथम क्रमांक, कु. विद्या भगत, जि.प. कन्या प्रशाला, हिंगोली व्दितीय आली.
या तालुकास्तरीय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठ दत्ता नांदे, शेषेराव आसोले, बबन कद्रे, सुधाकर गावंडे, दिनेश गुंडरे, संजय भाले, श्रीमती पत्तेवार मॅडम, श्रीमती जयश्री पत्रे, नरसिंग मोरे व विजय बांगर यांनी परिश्रम घेतले.
*****





No comments:
Post a Comment