05 November, 2026

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू पात्र मच्छीमार, मत्स्यपालकांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

 

        हिंगोली दि. 5 नोव्हेंबर(जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पात्र मच्छीमार, मत्स्यपालक आणि मत्स्यव्यवसाय करण्यास इच्छुक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.

        मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा शाश्वत विकास, मत्स्यउत्पादनात वाढ, रोजगारनिर्मिती तसेच मच्छीमार व मत्स्यपालकांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती साधणे हा या योजनेचा उद्देश आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या प्रचलित नियम व निकषांनुसार विविध घटकांचा लाभ घेता येणार आहे.

        इच्छुक लाभार्थ्यांनी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊन आवश्यक कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

        अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), हिंगोली कार्यालय, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली-४३१५१३ येथे संपर्क साधावा.

No comments: