01 January, 2021

01 जानेवारी ते 17 जानेवारी वाहन तपासाणी विशेष मोहीमेचे आयोजन

 


 

हिंगोली (जिमाका), दि.01 : 32 व्या रस्ते सुरक्षा महिना-2021 अंतर्गत 18 जानेवारीपासून हिंगोली जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान होत असून, त्याची पूर्व तयारी म्हणून वाहतूक नियम मोडणाऱ्या विरोधात 01 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत वाहन तपासाणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 01 जानेवारी पासून विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणे, वाहन चालवताना सिटबेल्टाचा वापर न करणे. बेदरकपने वाहन चालवणे, अवैध प्रवासी वाहतुक, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, प्रवासी वाहनातून माल वाहतुक करणे, भारक्षमतेपेक्षा अतिरिक्त मालवाहतूक करणे, वेगाने वाहन चालवणे, दारु पिऊन किंवा अंमली पदार्थांचे सेवन करुन वाहन चालवणे इत्यादी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई म्हणून अनुज्ञप्ती तसेच वाहन नोंदणी निलंबनाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

            सदर मोहिमेसाठी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक श्री. कळंबरकर, श्री. माने, श्री. कोपुल्ला यांनी नेमणूक करण्यात आली आहे. तरी हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी रस्ते सुरक्षा अभियानाची पूर्वतयारी म्हणून 01 जानेवारी पासून हिंगोली जिल्ह्यात वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                    ****

No comments: