हिंगोली, दि.8 (जिमाका): पशुसंवर्धन विभागांतर्गत कार्यरत असलेले राज्यातील
सर्व पशुवैद्यकीय दवाखाने हे विभागाच्या दि. 20 जून, 1996 च्या परिपत्रकात
दिलेल्या वेळांप्रमाणे दररोज दोन सत्रात चालु असतात. पशुपालकांच्या दृष्टीने या
वेळा अत्यंत गैरसोयीच्या ठरत असल्याने त्यामध्ये सुधारणा करणेबाबत अनेक
संघटना तसेच विविध ग्रामपंचायती
यांच्याकडून निवेदने, विनंती अर्ज वारंवार
प्राप्त होत होते. त्याद्वारे पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सलग असाव्यात अशी
मागणी होत होती. त्याअनुषंगाने खात्याच्या अधिपत्याखालील विभाग/कार्यालये तसेच
राज्यातील जिल्हा परिषदांकडून सदर बाबतीत अभिप्राय मागवून शासनास सुधारीत वेळा
मान्यतेस्तव प्रस्तावीत करण्यात आल्या होत्या.
त्यानुसार दि. 04 जानेवारी, 2021 च्या शासन पत्रान्वये मान्यता
घेवून पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सुधारीत करण्यात आल्या आहेत. कामकाजाच्या
वेळा संबंधीचे या पुर्वीचे सर्व आदेश / परिपत्रके रद्द करण्यात आली असून सुधारीत कामकाजाच्या वेळा खालील प्रमाणे
कटाक्षाणे आमलात याव्यात. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये असे
पशुसंवंर्धन आयुक्त पुणे यांनी कळविले आहे.
सुधारीत वेळेतील बदल पुढिल
प्रमाणे असा आहे. सोमवार
ते शुक्रवार सकाळी 09.00 ते दुपारी 04.30 वाजेपर्यंत राहील. यामध्ये जेवणाची
सुट्टी दुपारी 01.00 ते 01.30 अशी असेल. तर शानिवार रोजी सकाळी 08.00 ते दुपारी
01.00 वाजेपर्यंत वेळ असेल. सदर वेळ ही पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1/श्रेणी-2,
ता.ल.प.स.व.चि. (सर्व), जि.प.स.चि. (सर्व), फिरता पशुवैद्यकीय दवाखाने यांना लागू
राहील. तसेच पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी 24 तास सदैव सेवा उपलब्ध राहणार
आहे. तर कार्यालयात काम करणा-या चतुश्रेणी
कर्माचा-यांना सेवा सकाळी कामाच्या वेळेपुर्वी अर्धातास अगोदर व संध्याकाळी अर्धा
तास उशिरा जादा राहतील, असेही पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment