हिंगोली,दि.19 (जिमाका): 32 व्या
रस्ता सुरक्षा अभियान-2021 चे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समितीचे
सचिव रुचेश जयवंशी यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवून करण्यात आले.
यावेळी वाहतुक शाखा हिंगोली येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधिक्षक राकेश कलासागर,
प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव बलाचे समादेशक संदीपसिंग गिल्ल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक
यशवंत काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पोत्रे, राज्य परिवहन
महामंडळाचे हिंगोलीचे आगार प्रमुख प्रेमचंद्र चौथमल, आदींची उपस्थिती होती.
यावेळी
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, वाहतुक
उद्यान निर्मीती करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले. जेणे करुन वाहतुक
उद्यानामुळे मुलांमध्ये लहानपणापासुनच वाहतुकीच्या नियमांची जन जागृती होण्यास मदत
होईल. तसेच यावेळी त्यांनी सर्व नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून वाहतुकीचे नियमाचे
पालन करुन आपले आणि इतरांच्या प्राणांचे संरक्षण करावे असे आवाहनही केले.
अध्यक्षीय
भाषणात पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांनी वाहतुक नियमाचे पालन करण्याबाबत सविस्तर
मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता
जोशी यांनी ‘सडक सुरक्षा जिवन रक्षा’ या शासनाने दिलेल्या ब्रिद वाक्याबाबत माहिती
दिली. सदर अभियान दि. 18 जानेवारी ते 17 फेब्रूवारी, 2021 या कालावधीत राबविण्यात येणार
असुन या कालवधीत विविध उपक्रम राबवित जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील
नवीन रस्त्याचा वापर करतांना अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सर्व जनतेंनी वाहनाच्या
गतिवर नियंत्रण ठेवावे व वाहतुकीचे नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले.
32 व्या रस्ता सुरक्षा अभियान-2021 कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी
वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक ओंकार चिंचोलकर, मोटार वाहन निरीक्षक सुदेश कंदकुर्तीकर,
श्रीमती नलिनी कांळपांडे व शैलेशकुमार कोपुल्ला तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यलय, वाहतुक पोलीस विभागाचे अधिकारी
कर्मचारी यांनी प्रयत्न केले. तर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक
वसंत कंलबकर यांनी आभार मानले.
****
No comments:
Post a Comment