21 January, 2021

व्यायामशाळा विकास/क्रीडांगण विकास/युवक कल्याण अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

व्यायामशाळा विकास/क्रीडांगण विकास/युवक कल्याण

अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली, दि.21 (जिमाका) : सन 2020-21 या आर्थिक वर्षात व्यायामशाळा विकास / क्रीडांगण विकास/युवक कल्याण (सर्व साधारण/विशेष घटक/आदिवासी) योजनेतंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यावतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहे. तसेच ज्या संस्थांना व्यायामशाळा विकास / क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत सन 2019-20 मध्ये प्रथम हफ्ता/व्दितीय हफ्ता वितरीत करण्यात आला त्या संस्थांनी आपल्या उर्वरीत अनुदानासाठी / साहित्यासाठी प्रस्ताव सादर करावेत.

या योजनेतंर्गत नवीन व्यायामशाळा विकास अनुदान योजनेसाठी नवीन शासन निर्णय दि. 16 जानेवारी 2018 व दि. 08 जानेवारी 2019 नुसार व्यायामशाळा साहित्य / खुली व्यायामशाळा करीता शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनुदानित शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद, सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वस्तीगृह, समाज कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणा-या अनुदानित शाळा, शासकीय उप जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, शासनाने मान्यता दिलेल्या अनुदानित शैक्षणिक शाळा, महाविद्यालय, पोलिस कल्याण मंडळ/ पोलिस विभाग, शासकीय कार्यालय इ. कडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. (सेवाभावी संस्था, व्यायामशाळा, क्रीडा मंडळ, महिला मंडळ इ.हे अपात्र आहेत. यांनी प्रस्ताव सादर करुन नयेत)

तसेच नवीन क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी नवीन शासन निर्णय दि. 07 सप्टेंबर 2019 नुसार क्रीडा साहित्य व क्रीडांगण विकास करीता शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनुदानित शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद, सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वस्तीगृह, समाज कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणा-या अनुदानित शाळा,शासकीय उप जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, शासनाने मान्यता दिलेल्या अनुदानित शैक्षणिक शाळा, महाविद्यालय, पोलिस कल्याण मंडळ/ पोलिस विभाग, शासकीय कार्यालय इ. कडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. (सेवाभावी संस्था, व्यायामशाळा, क्रीडा मंडळ, महिला मंडळ इ. हे अपात्र आहेत. यांनी प्रस्ताव सादर करुन नयेत)

तसेच युवक कल्याण विषयक अनुदान योजना सन 2019-20 या आर्थिक वर्षात शिल्लक राहिलेल्या प्रस्तावा प्राधान्य क्रमाने विचार करण्यात येणार असून लाभार्थ्यांनी त्रुटींची पुर्तता लवकरात लवकर करावी. तद्नंतरच नविन प्रस्तावांचा विचार करण्यात येईल. तसेच सन 2019-20 या आर्थिक वर्षात ज्या संस्थांना अनुदान देण्यात आले होते. अशा संस्थांनी सन 2020-21 करीता प्रस्ताव दाखल करतांना कार्यक्रमाचा अहवाल, विनियोग प्रमाणपत्र, ऑडीट रिपोर्ट, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे कार्यरत प्रमाणपत्र प्रस्तावा सोबत सादर करावेत. तसेच मा. धर्मादाय आयुक्त, हिंगोली  यांनी रद्द केलेल्या संस्थांनी प्रस्ताव सादर करु नयेत. कार्यक्रमाचा अहवाल, विनियोग प्रमाणपत्र सादर न केल्यास सदरील संस्था अपात्र करण्यात येईल.

इच्छूकांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत विहित अर्जाचे नमुने दि.20 ते 27 जानेवारी  2021 या कालावधीत सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. या वेळेत उपलब्ध आहेत. परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख दि.29 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंत आहेत. तसेच प्रस्ताव दाखल करण्याची वेळ दुपारी 3 ते 6 आहे. विहित मुदतीनंतर प्रस्ताव स्विकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

 

****

No comments: