08 January, 2021

कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर येथे शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन व मधुमक्षिका पालन अभ्यासक्रम सुरु

 

कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर येथे शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन व

मधुमक्षिका पालन अभ्यासक्रम सुरु

 

हिंगोली, दि.8 (जिमाका) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारे मुक्त कृषी शिक्षण केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर येथे शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन व मधुमक्षिका पालन अभ्यासक्रम सुरु...

       यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारे मुक्त कृषी शिक्षण केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर येथे शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी Online पध्दतीने प्रवेश अर्ज स्वीकारणे सुरु झाले असून दि.31 जानेवारी 2021 ही ‍अंतिम तारीख आहे. या अभ्यासक्रमासाठी 10 वी उत्तीर्ण  वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या कोणालाही हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. हा अभ्यासक्रम 6 महिने कालावधीचा असून दर आठवडयाला Online पध्दतीने वर्ग घेतल्या जातील, परीक्षा मात्र  Offline पध्दतीची राहील.

       तसेच मधुमक्षिका पालन अभ्यासक्रम सुध्दा सुरु करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी सुध्दा Online पध्दतीने प्रवेश अर्ज स्वीकारणे सुरु झाले असून दि. 31 जानेवारी 2021 ही ‍अंतिम तारीख आहे. या अभ्यासक्रमासाठी सुध्दा 10 वी उत्तीर्ण  वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या कोणालाही हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. हा अभ्यासक्रम सुध्दा 6 महिने कालावधीचा असून दर आठवडयाला Online पध्दतीने वर्ग घेतल्या जातील, परीक्षा मात्र  Offline पध्दतीचीच राहील.

       या दोन्ही अभ्यासक्रमासाठी हिंगोली जिल्हयातील ग्रामीण तरुणांनी मोठया प्रमाणात भाग घ्यावा असे आवाहन मुक्त कृषी शिक्षण केंद्राचे केंद्र प्रमुख डॉ.पी.पी.शेळके व केंद्र संयोजक प्रा.अनिल ओळंबे यांनी केले आहे .

 

00000

No comments: