कोविड लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीरित्या
पूर्ण
हिंगोली, दि.8
(जिमाका) : आज जिल्हा रुग्णालय येथे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीची रंगीत तालिम
(ड्रायरन) ची प्रक्रीया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांच्या मार्गर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र
सुर्यवंशी याच्या नियंत्रणात अप्रत्यक्ष
लसीकरणास सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम पोलीस विभागाचे प्रतिनिधी यांनी प्रथम लस
घेणाऱ्या सर्व लाभार्थीची सॉफ्टवेअर नोंदणी प्रमाणे पॅन कार्ड पडताळणी करण्यात
येऊन नोंदणीप्रमाणे पॅनकार्ड खात्री झाल्यानंतर संबंधिताना कोविन ॲपमध्ये
लाभार्थींची नोंदणी करण्यात आली. आजच्या ड्रायरन
मध्ये एकूण 25 लाभार्थी यांना लस देण्यात आली. यांनंरतचे लसीकरण सत्र हे
शासनाचे आदेशानुसार वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शक सुचनेनुसार राबविण्यात येणार असल्याचे
जिल्हाधिकारी जयवंशी यांनी यावेळी सांगितले. लस देण्यात आलेल्या लाभार्थींना
डॉक्टरांच्या निगराणीखाली अर्धातास ठेवण्यात आले. दरम्यान यांच पल्स ऑक्सीन ,बी.पी.,
शुगर ई. चाचण्या करण्यात येऊन स्थिती ठिक असल्यास खात्री करुन कोणताही त्रास नसल्याची
खात्री करण्यात आली.
तसेच लसीकरणाच्या लाभ घेतलेल्या व्यक्तींना
त्यांच्या वैयक्तीक मोबाईल नंबर वरती त्यांचे लसीकरण यशस्वीरित्या झाल्याचा संदेश
कोविन ॲपद्वारे पाठविण्यात आले .
याप्रासंगी वैद्यकीय
अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. मंगेश टेहरे , डॉ. रविंद्र जायभाये आदी उपस्थित होते.
कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालीमच्या यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग यांनी प्रयत्न
केले.
तसेच उपजिल्हा
रुग्णालय कळमनुरी आणि प्राथमिक आरोगय केंद्र डोंगरकडा येथेही कोविड कोविड
लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीरित्या पूर्ण
कण्यात आली .
0000
No comments:
Post a Comment