राष्ट्रीय
निवृत्ती वेतन योजनेतील अडचणी सोडविण्यसाठी
आहरण
व संवितरण अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन
हिंगोली,दि.11(जिमाका):
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना येणाऱ्या
अडचणीच्या निराकरणासाठी दि. 13 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील
जिल्हा नियोजन सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण
अधिकाऱ्यांनी 13 जानेवारी जिल्हा नियोजन सभागृहात दुपारी 12.00 वाजता उपस्थित राहावे.
असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment