हिंगोली,दि.12: राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड या जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
रविवार, दि. 24 जानेवारी,2021 रोजी दुपारी 02.30 वाजता
सेनगाव येथे आगमन व राखीव. सायंकाळी 05.00 वाजता सेनगावहून मोटारीने हिंगोलीकडे
प्रयाण. सायंकाळी 06.00 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
सोमवार, दि. 25 जानेवारी, 2021
रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 02.00 वाजता कार्यकारी समिती (जिल्हा नियोजन
समिती) बैठकीस उपस्थिती. दुपारी 02.00 वाजता राखीव. दुपारी 03.00 ते सायंकाळी
06.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. रात्री 09.00 वाजता
शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे मुक्काम.
मंगळवार, दि. 26 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 09.00 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालय, हिंगोली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती.
सकाळी 10.30 वाजता राखीव. दुपारी 12.00 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती.
सायंकाळी 04.00 वाजता हिंगोली येथून मोटारीने परभणी कडे प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment