27 January, 2021

जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांच्या हस्ते प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ

 


 

हिंगोली, दि.27 (जिमाका) :  केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची महत्वकांक्षी योजना प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY 3.0) चा शुभारंभ दि. 26 जानेवारी , 2021 रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

तरुण ही देशाची ताकद आहे. या तरुणांना विविध कौशल्य प्रदान करुन दिशा देण्यासाठी प्रत्येक लोकसभा क्षेत्रासाठी एक याप्रमाणे प्रधान मंत्री कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

हिंगोली येथील प्रधान मंत्री कौशल्य केंद्र अकोला बायपास, माऊली नगर, हिंगोली येथे असून प्रथम टप्यात 120 उमेदवार प्रशिक्षण लक्ष्यासाठी In-Line Checker व Inventory Clerk या दोन रोजगाराभिमुख विनामूल्य कौशल्य  प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे.

रोजगार इच्छूक युवक-युवतींना मोफत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देवून प्रमाणपत्र प्रदान करणे, प्रशिक्षणानंतर रोजगार व स्वयंरोजगार प्राप्तीसाठी सहाय करणे, पुर्वानुभवाने प्राप्त कौशल्याचे प्रमाणिकरण करणे , खाजगी क्षेत्रातील प्रशिक्षण केंद्राचा सहभाग वाढविणे हे या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 200 ते 500 तासापर्यंतचे अल्प कालावधीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क आधारे उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिक रोजगार मागणी आधारे प्रशिक्षण अभ्यासक्रम निवडून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त (प्र.) प्र. सो. खंदारे यांनी दिली आहे .

 ****

 

No comments: