हिंगोली,दि.12 (जिमाका): आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षण घेण्यासाठी सन 2021-22 या शैक्षणिक
वर्षात इ. 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील (हिंगोली व
परभणी जिल्हे) अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इ. 1 ली व 2 री मध्ये प्रवेश घेऊ
इच्छिणा-या पालकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथे दि. 10 मार्च,
2021 पर्यंत अर्ज करावा.
पालकांनी
अर्जासोबत जातीचा दाखला (संबंधीत उपविभागीय अधिकारी), कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.
01 लक्ष रुपये पर्यंत असावे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र संबंधीत तहसिलदार यांचे जोडावे. विद्यार्थ्यांचे
वय जून-2021 पर्यंत 6 वर्ष पूर्ण असावे व त्याबाबतचे विद्यार्थी जन्म प्रमाणपत्र संबंधीत
ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांचे असावे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन
पासपोर्ट साईज फोटो व पालकाचे संहमंतीपत्र इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अपंग, विधवा, घटस्पोटीत, निराधार
व परितक्त्या आदी पालकांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच शासकीय / निमशासकीय
नोकरदारांच्या पाल्यांना सदर योजनेचा लाभ अनूज्ञेय नाही.
हिंगोली
व परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पालकांनी आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या
नामांकित शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरीता विहीत कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment