हिंगोली(जिमाका),दि.1: लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांची
निवड सूची 20 डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. याबाबत नवीन निवड सूची तयार करण्यात
येणार आहे. जिल्ह्यातील लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांनी निवड सूचीसाठी जिल्हा
माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे 21 जानेवारी पर्यंत अर्ज
सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले आहे.
निवड सूचीसाठी
dgipr.maharashtra.gov.in व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाबरोबरच जिल्हा माहिती कार्यालय,
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे अर्ज उपलब्ध आहेत. तरी इच्छुक संस्थांनी निवड
सूचीसाठीचे अर्ज गुरुवार, दि. 21 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावेत, असे आवाहनही जिल्हा
माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment