हिंगोली,दि.25 (जिमाका): दीडशे वर्षाची परंपरा
लाभलेल्या ऐतिहासिक रामलीला मैदानाचे जिल्हा नियोजनअंतर्गत 4 कोटी रुपये खर्च करुन
रामलीला मैदानास संरक्षण भिंत तयार करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मैदानाचे
सपाटीकरण करुन मैदानाच्या आतील भागात चारही बाजूंनी पद पथ (रनींग ट्रॅक) व
वृक्षारोपण करुन मैदानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या मैदानाचे लोकार्पण आज राज्याच्या
शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन
व फित कापून करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, खासदार सर्वश्री राजीव
सातव, हेमंत पाटील, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, संतोष बांगर,
विप्लव बाजोरिया, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य
कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा हे उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment