हिंगोली,
दि.27 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राअंतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेबाबत
ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे गुगल मीटवर मिटींग युआरएल : https://meet.google.com/rwy-jyts-sfs या संकेतस्थळावर दि. 28 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता आयोजन करण्यात
आले आहे.
या ऑनलाईन समुपदेशन व करिअर मार्गदर्शन
सत्रामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाअंतर्गतच्या योजनेबाबत मंडळाचे जिल्हा
व्यवस्थापक एस.टी. बागूल हे मार्गदर्शन करणार आहेत.
या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी
https://meet.google.com/rwy-jyts-sfs या लिंकवर क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप यापूर्वी
इन्स्टॉल केलेले नसेल तर इन्स्टॉल करुन घ्यावे. गुगल मीट ॲपमधून कनेक्ट झाल्यानंतर
Ask to join वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनीटे वेळेपूर्वी
जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद
(mute) करावे. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु (Unmute) करुन विचारावे व लगेच माईक बंद
(mute) करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारतांना मोजक्या शब्दात विचारावेत.
या मार्गदर्शन सत्राबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर
संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment