14 July, 2021

 

जागतिक युवा कौशल्य दिन 15 जुलै रोजी

विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 14 : भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयामार्फत सन 2015 पासून जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात येत आहे. याही वर्षी दि. 15 जुलै, 2021 रोजी जागतिक युवा कौशल्य  दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विषयक अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांचे नियोजन करुन हिंगोली शहरासाठी उर्मिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे जनरल ड्यूटी असिस्टंट ॲडव्हान्स या प्रशिक्षण बॅचचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सुशिक्षित गरजू बेरोजगारांना दुपारी 1.00 वाजता गुगल मिटद्वारे मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास योजनेअंतर्गत रोजगाराची संधी व परिपूर्ण मार्गदर्शन या विषयावर समुपदेशन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या समुपदेशन शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी shorturl.at/bms09 या लिंकद्वारे सहभाग नोंदवावा.  तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयामार्फत हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा उद्योग योजनाविषयीची (डिस्ट्रीक्ट बिझनेस प्लॅन) माहिती  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या Hingolirojgar या फेसबूक अकाऊंटवर अपलोड करण्यात आली आहे.

जास्तीत जास्त उमेदवारांनी वरील लिंकद्वारे समुपदेशन शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा आणि फेसबूक अकाऊंटला फॉलो करावे, असे आवाहन प्र. सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

 **** 

No comments: