नोंदीत घरेलू कामगारांनी वैयक्तीक माहिती, बँक तपशील अद्यावत करावे
हिंगोली (जिमाका) , दि. 01 : महाराष्ट्र घरेलू
कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत कामगारांना कोविड-19 प्रादुर्भाव काळात आर्थिक मदत
करण्याच्या दृष्टीने शासनाने प्रत्येकी 1 हजार 500 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे.
परंतु सन 2011 ते 2014 पर्यंत नोंदीत घरेलू कामगारांची माहिती ऑनलाईन संकलीत
केलेली नाही. तसेच 2015 ते 2021 या कालावधीत बऱ्याच नोंदीत घरेलू कामगारांचे बँक
तपशील उपलब्ध नाहीत.
नोव्हेंबर, 2011 ते दि. 31 मार्च, 2021 या
कालावधीतील सर्व नोंदीत घरेलू कामगारांनी त्यांची वैयक्तीक माहिती तसेच बँक
खात्याचा तपशील अद्यावत करण्यासाठी https://public.mlwb.inpublic या लिंकचा वापर करावा अथवा सरकारी कामगार
अधिकारी यांचे कार्यालय, पलटण, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन सरकारी
कामगार अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment