जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 07 रुग्ण ; तर 05 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
19 रुग्णांवर उपचार सुरु, एका रुग्णांचा मृत्यू
हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात 07 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे कळमनुरी परिसरात 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे सेनगाव परिसरात 06 व्यक्ती असे एकूण 07 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 05 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 08 रुग्णांची प्
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 15 हजार 986 रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 580 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 19 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 387 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment