19 July, 2021

 

अनुदान योजना व बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्यासाठी

संपर्क साधण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 19  :  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाज व 12 पोटजातींना विविध योजनेचा बँकेमार्फत लाभ देण्यात येतो. सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये अनुदान योजना व बीज भांडवल योजनेची उद्दिष्टे प्राप्त झालेली आहेत.

अनुदान योजनेसाठी प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयापर्यंत गुंतवणूक असणाऱ्या रक्कमेमध्ये 10 हजार रुपये अनुदान व उर्वरित बँकेचे कर्ज असणार आहे.

बीजभांडवल योजनेसाठी  प्रकल्प मर्यादा 50 हजार एक ते 7 लाख रुपयापर्यंत असलेल्या प्रस्तावासाठी  लाभार्थीचा सहभाग 5 टक्के व महामंडळाचे कर्ज 20 टक्के   (दहा हजार रुपये अनुदानासह) आहे. तर बँकेचे कर्ज 75 टक्के असणार आहे. या योजनेत स्थिर भागभांडवल उद्योगाचे कर्ज प्रस्ताव उदा. वाहन, यंत्रे व मशिनरी खरेदी  व तसेच इतर विविध व्यवसायासाठी उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत.

वरील दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्रे, फोटो दोन प्रतीत, रेशन कार्ड, आधारकार्ड, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेचा पुरावा, व्यवसायाचे कोटेशन, अनुभव प्रमाणपत्र, शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र व शौचालय बांधल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, निवडणूक ओळखपत्र, दुकानाचा परवाना, लायसन्स, बॅच, परमीट इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

वरील योजनेच्या कर्जाचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 50 च्या आत असलेल्या गरजू लाभार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

 

****

No comments: