जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 02 रुग्ण ; तर 05 रुग्ण बरे झाल्याने
डिस्चार्ज
· 29
रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली, (जिमाका) दि. 03 :
जिल्ह्यात 02 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन
टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती व वसमत परिसर 01 व्यक्ती असे एकूण 02 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 05
कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील
आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 12 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू
आहे. तर 03
कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात
आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 15 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत
त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 15 हजार 950 रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 538 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज
घडीला जिल्ह्यात एकूण 29 रुग्णांवर उपचार सुरु
आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 383 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment