08 July, 2021

 

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा

इच्छूक व्यक्ती, संस्थानी लाभ घ्यावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 :  केंद्र शासनाने सन 2020-21 या वर्षापासून पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजुरी प्रदान केली आहे. या योजनेसाठी सन 2021-22 या वर्षात 15 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

या योजनेअंतर्गत दूध प्रक्रिया (आईस्क्रीम, चीज निर्मिती, दुध पाश्चराईजेशन, दुध पावडर इत्यादी), मांस निर्मिती व प्रक्रिया , पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज  मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 90 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. व्याजामध्ये 3 टक्के सुट देण्यात येणार आहे.  योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या http://dahd.nic.in/ahdf या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या http://ahd.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकवर योजनेच्या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिध्द करण्यात येत आहेत .

योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. केंद्र शासनाने वर नमूद उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चत वीर्य मात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुध्द वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन याबाबीचा समावेश करण्यात आलेला आहे .

वरील योजनेचा इच्छूक व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादन संस्था, खाजगी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांनी लाभ घ्यावा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे .

******

No comments: