गृह व वित्त
राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली, (जिमाका) दि. 15 : राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क,
कौशल्या विकास रोजगार व उद्योजकता, पणन विभागाचे राज्यमंत्री शंभूराज शिवाजीराव
देसाई हे दि. 18 जुलै, 2021 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. 18 जुलै, 2021 रोजी दुपारी 2.00 वाजता परभणी येथून
औंढा नागनाथ मार्गे हिंगोलीकडे प्रयाण. 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली
येथे आगमन. 4.00 वाजता गृह, वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास
रोजगार उद्योजकता, पणन विभागाची हिंगोली जिल्हा आढावा बैठक (स्थळ : शासकीय
विश्रामगृह, हिंगोली). 4.45 वाजता हिंगोली जिल्हा शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत
बैठक (स्थळ : शासकीय विश्रामगृह, हिंगोली), सांय. 6.00 वाजता हिंगोली येथून
वाशिमकडे प्रयाण .
****
No comments:
Post a Comment