01 July, 2021

 मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा

-- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका) , दि. 01 : राज्यामध्ये कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधनाची तीव्र कमतरता जाणवत आहे. यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाशी निगडीत पॅरामेडिकल क्षेत्रातील मनुष्यबळ तयार करण्यासाठी राज्य शासनाची मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आरोग्य व पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील कोर्सेसमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग स्वरुपात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. हे प्रशिक्षण कार्यक्रम नि:शुल्क असून प्रशिक्षणांती उमेदवारास प्रमाणपत्र व रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

इच्छूक व पात्र उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी  https://forms.gle/LXG93k9yYiQYZa6t5 या लिंकचा वापर करुन नोंदणी करावी आणि सोबतच्या गुगल फॉर्ममध्ये माहिती भरुन सबमिट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा कौशल्य विकास जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

*****

No comments: