23 July, 2021

 

जात वैधता प्रमाणपत्र प्रस्तावाच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी

27 जुलै रोजी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय भवन येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने दि. 27 जुलै, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे.

हा वेबीनार झूम ॲपवर होणार असून या वेबिनारमध्ये अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करतांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यात येणार आहे. या वेबिनारसाठी मिटींग आयडी : 876 2060 7065, पासवर्ड : 12345 असा आहे. या वेबिनारमध्ये जॉईन होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी / उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: